राज्य सहकारी बँकेची चौकशी : पृथ्वीराज चव्हाणांचा शर्ट पकडा; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांना टोमणा

सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा पुरावा सापडला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अन्य ६५ जणांविरोधातील प्रकरण बंद करण्याचा मुंबई पोलिसांचा अहवाल आल्यानंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले होते की, मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा घोटाळा झालाच नव्हता. मी बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली.

मुश्रीफांच्या या आरोपाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला – राज्य सहकारी बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना लावली. राज्य सहकारी बँक बरखास्त करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा शर्ट पकडावा.

आज साताऱ्यात चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. हसन मुश्रीफ यांच्या टीकेबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत, हे असे नेते आहेत की ज्यांना माझ्याबद्दल बोलले तरच प्रसिद्धी मिळते. त्यांचे अज्ञान किती असावे, राज्य सहकारी बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना लावली. राज्य सहकारी बँक बरखास्त करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव दिला होता.

ते पुढे म्हणालेत, सरकारच तुमचे असल्याने तुम्ही सगळेच विषय गुंडाळत आहात. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण असो किवा धनंजय मुंडे प्रकरण. एवढेच नव्हे तर तुमच्या पक्षाच्या युवक आघाडीच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप असतानादेखील अजून साधी अटक केली नाही! हसन मुश्रीफ यांना या सर्व गोष्टीची जाणीव असावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER