हा पडद्यावरचा खलनायक, मात्र प्रत्यक्ष आयुष्यात हिरो; जयंत पाटलांकडून सोनू सुदचे कौतुक

Sonu Sood & Jayant Patil

मुंबई :देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली . त्यामुळे इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना प्रवासाची बंदी घालण्यात आली होती. मात्र रोजगार तुटल्यामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. या संकटमय काळात अनेक जण परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावण्यात प्रसिद्ध असलेल्या सोनू सुदने या काळात अनेक कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बसगाड्यांची सोय केली.

काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील कामगारांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बसगाड्यांची सोय केली. त्याच्या याच कामाचे राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे. पडद्यावर खलनायकाचे काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचे काम करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER