राज्य बँक घोटाळा प्रकरणी आ. मुश्रीफ यांच्या दावा ठरला खोटा

Hasan Mushrif

कोल्हापूर : राज्य बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ७६ संशयित ओरोपींच्या यादीत नाव असल्याने हसन मुश्रीफ यांना मिळालेला दिलासा अल्पजीवी ठरला. दरम्यान, या घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यालायलात दाखल याचिकेत प्रतिवादी मध्ये आपले नाव नाही. त्यामुळे आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार नाही, असा असा दावा कोल्हापुरात मुश्रीफ यांनीी केला होता. मुश्रीफ यांचा दावा खोटा हरल्याची चर्चा कोल्हापुरात सुरू आहे.

राज्य सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ असताना या बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. रिझव्ह बँक आणि नाबार्डच्या तपासणीत हा घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन संचालक मंडळाने कर्ज वाटपात घोटाळा केला. संचालकांच्या सोयी सुविधांसाठीही उधळपट्टी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला पहिला सुरुंग लावला होता. हीच कारवाई आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अंगाशी आली आहे.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात महापुराचे राजकारण

राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला होता. त्यानुसार सोमवारी राज्य बँकेच्या माजी संचालक व काही अधिकारी अशा ७६ जणांविरोधात मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील संशयित आरोपी म्हणून हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या प्रकरणी सुरींदर आरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ५५ जणांना प्रतिवादी केले होते. त्यात हसन मुश्रीफ यांचे नाव नव्हते. त्यामुळेच या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. मात्र, पोलीसांत दाखल संशयित आरोपींच्या यादीत नाव असल्याने हसन मुश्रीफ यांची विधानसभा निवडणुकीची वाटचाल खडतरीची ठरणार आहे.