राज्याची चिंता वाढली; आज दिवसभरात ६३ हजार २८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रुग्णांच्या मृत्युसंख्येतही मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारची चिंता आणखीनच वाढलेली आहे. या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १५ मेपर्यंत वाढवला आहे. शिवाय, आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासदेखील सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्येतील वाढ व रुग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ६३ हजार २८२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.४९ टक्के एवढा आहे.

याशिवाय आज ६१ हजार ३२६ रुग्ण बरेदेखील झाले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण ३९,३०,३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.२४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७३,९५,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,६५,७५४ (१७.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६३,७५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button