आरक्षण लागू होईपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी या योजना सुरू करा – उदयनराजे भोसले

Udyanraje Bhosle

मुंबई :  मराठा समाजचे आरक्षण (Maratha Reservation) पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले व स्थगिती येऊन घटनापीठाकडे गेले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी यावरून विद्यमान सरकारला दोष देत आरक्षणासाठी सरकार कमी पडल्याची भावना बोलून दाखवली.

मराठा आर7णासाठी भाजपचे (BJP) अनेक मराठा नेते राज्य सरकारला महत्त्वाचे सल्ले देताना दिसत आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्य सरकारला आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी विविध सवलती आणि योजना लागू कराव्या असे आवाहन केले आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषत: ज्या दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा,’ असे उदयनराजे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर उदयनराजे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांनी मराठा समाजासाठी विविध योजना लागू करण्याची मागणी केली आहे.