हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करा : आपची मागणी

हमी भाव खरेदी केंद्रे सुरू करा आपची मागणी

कोल्हापूर : केंद्र सरकारने (Central Government) २०२०-२०२१ साठी कृषी पिकांना हमीभाव घोषित केला आहे. जिल्ह्यात उसानंतर भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुकास्तरावर सरकारी हमीभाव केंद्रे सुरू करा. शासनाने हमीभाव केंद्रे वेळेत सुरू करून शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्यास आम आदमी पार्टी (AAP) तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी व गगनबावडा या तालुक्यांत भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच हातकणंगले, शिरोली, गडहिंग्लज, कागल, करवीर या तालुक्यांत सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे सुरू नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष निलेश खेडेकर, जयंत पवार, कृष्णा कानेकर, नेताजी बुवा, शरद पाटील, भिकाजी कांबळे, बाळासो जाधव, विश्वनाथ शेट्टी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER