कोल्हापूरची विमानसेवा सुरू करा : खा. संभाजीराजे

कोल्हापूर : केंद्रीय हवाईउड्डाण मंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांची सोमवारी खा. संभाजीराजे यांनी भेट घेतली. मुंबई विमानतळावर वाढत चाललेल्या विमान वाहतुकीच्या अतिरिक्त भारामूळे काही काळ कोल्हापूरातील विमानसेवा बंद करण्यात असल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कनेक्टेड विमान सेवा सुरु करावी अशी विनंती त्यांना संभाजीराजे यांनी केली.

कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज किमान ७० ते ८० लोक प्रवास करत असतात. तसेच सध्या पर्यटनाचा काळ असल्याने कोल्हापूरात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने विमानसेवेला मिळणाऱ्या प्रतिसादात वाढच होणार असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत यावर निश्चितच पर्यायी मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले.