संजय राऊतांनी ‘शटअप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सीझन; कुणाल कामराचे निमंत्रण

Kunal Kamra - Sanjay Raut

मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केले आहे.

‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरू करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्विट  कुणाल कामराने केले आहे.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या निमित्ताने मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे राऊत आता मुलाखत देताना दिसणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER