सीबीआय चौकशीवेळी देशमुखांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहा, पवारांची नेत्यांना सूचना

Anil Deshmukh-Sharad Pawar

मुंबई : परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिल्वर ओक इथे झालेल्या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे (NCP) नेते देशमुख (Anil Deshmukh) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनिल देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका माध्यमात मांडण्यात पक्षातील नेते कमी पडले यावरुन पवारांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे अनिल देशमुख सीबीआय चौकशीस सामोरे जातील तेव्हा त्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहा, असे पवारांनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थितीत होते.

दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. राज्यात नव्हे तर देशातही इतकी गंभीर आणि भयावह परिस्थिती कधीच नव्हती. हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button