
मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात समाज आर्थिक संकटात सापडल्यामुळे राज्य सरकारने मालमत्ता खरेदीवरचे कमी केलेले मुद्रांकशुल्क जानेवारीपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ही मुद्रांकशुल्क सूट मार्चपर्यंत कायम ठेवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली आहे.
राज्य सरकारने कोरोनाकाळात सप्टेंबर पासून मालमत्ता खरेदीवर ३ टक्के मुद्रांकशुल्क सवलत दिली त्यानंतर घरखरेदी व्यवहारात चांगली वाढ झाली. मात्र, जानेवारी पासून त्यात १ टक्का वाढ होणार आहे. ही वाढ मार्चपर्यंत करू नका, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने सप्टेंबर पासून मालमत्ता खरेदीवर 3% मुद्रांकशुल्क सवलत दिली त्यानंतर घरखरेदीत बऱ्या पैकी वाढ झाली , जानेवारी पासून त्यात 1% वाढ होणार आहे, आमची सरकार ला विनंती आहे की त्यांनी हि सूट मार्च पर्यंत कायम ठेवावी.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 5, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला