कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३१ जुलै पर्यंत आटोपा

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी एप्रिल – मे महिन्यात करण्यात येतात मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे यावर्षी या बदल्या अजून करण्यात आल्या नाहीत. या बदल्यांची कारवाई ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

याबाबतच्या परिपत्रकात निर्देश देण्यात आला आहे की – कोरोनाच्या साथीमुळे सरकारच्या महसुलात घट झाल्याने सर्वसाधारण व अपवादात्मक परिस्थिती आणि विशेष कारणाने करायच्या सर्व बदल्या संबंधित संवर्गातील एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या १५ टक्के पर्यंत मर्यादित संख्येतच कराव्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER