रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा रुग्णांसोबत डान्स!

Staff dance with patients - Maharashtra Today

तिनसुकिया : आसाममधील कोविड केअर सेंटरमध्ये कर्मचारी पीपीई किट घालून कोरोना रुग्णांचं मनोबल वाढवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हा व्हीडिओ शेअर केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून करोना रुग्णांसोबत डान्स आणि व्यायाम केला. हा व्हीडीओ आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील दिगबोई परिसरातील कोविड केअर सेंटरमधला आहे.

करोना रुग्णांवरचे मानसिक दडपण दूर करण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सनी यात पुढाकार घेतला होता. आधी डान्स करून त्यांनी वातावरण हलके केले व नंतर व्यायाम केला. रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी उचलेलं पाऊल कौतुकास्पद आहे, असे म्हणत नेटिजन्स या व्हीडीओला दाद देत आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button