दोन वर्षांपूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्याची केली बदली ! एसटीत सावळा गोंधळ

st-bus

मुंबई : एसटी महामंडळाने (ST Mahamandal) ३७९ चालक आणि १०८ वाहकांच्या बदल्यांची यादी गुरुवारी जाहीर केली. यात दोन वर्षांपूर्वी निधन (Pass Away) झालेल्या पालघर विभागातील गोरक्षनाथ कंठाळे या कर्मचाऱ्याची महामंडळाने बदली केली आहे!

बदल्या करताना सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. बदल्यांच्या यादीत एका मृत कर्मचाऱ्याचे नाव होते. काही कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगडला बदली झालेल्या कर्मचाऱ्याची रायगडवरून पुन्हा अहमदनगरला बदली करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीचे नियम डावलण्यात आले आहेत. एकत्रित सेवा ज्येष्ठता नियम लावला पाहिजे, पण विभागातील सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली आहे. हा नियम पहिल्यांदा लावण्यात आला आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे. अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER