एसटीने कर्मचाऱ्यांच्या एलआयसी व भविष्यनिर्वाह निधीचे हप्ते भरले नाहीत – आरोप

मुंबई : एसटी महामंडळात (ST Mahamandal) ४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे (LIC) हफ्ते कट होत आहे परंतु ते एलआयसीकडे जमा झाले नाहीत. अनेकांना पॉलिसी लॅप्स (Policy lapses) होत असल्याचे मेसेज येत आहेत. कामगार संघटनांच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे सुमारे २ कोटी रुपये महामंडळाने जमा केले नाहीत. त्यामुळे याकाळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार, असा सवाल कामगार संघटनांनी (trade unions) केला आहे.

याशिवाय एसटी महामंडळाचे भविष्यनिर्वाह निधीचे देखील हफ्ते जात नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. पॉलिसीचे हफ्ते एसटी महामंडळाने एलआयसीकडे भरणं बंद झाल्यापासून म्हणजे मागील ४ महिन्यात एसटी महामंडळात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या शंभर-दीडशेच्या आसपास आहे. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कुठून भरपाई मिळणार असा सवाल संघटनांनी केला आहे. एसटी महामंडळाने आत्तापर्यंत मृत २३९ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ९ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये विम्याची रक्कम दिली आहे. बाकी कर्मचाऱ्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.

गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

या संपूर्ण प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कर्मचाऱ्यांचे पॉलिसीचे पैसे न भरणं, भविष्यनिर्वाह निधीचा हफ्ता न देणं या बाबी गंभीर असून याप्रकरणी सरकारने नेमलेल्या आयएएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता – मागील काही महिन्यांपासून एसटीचे उत्पन्न बंद असल्यामुळे रक्कम जाऊ शकली नाही. आता एसटीच्या मुख्यालयाकडे पैशांची मागणी केली असून पुढील २ दिवसांत ही रक्कम एलआयसीच्या खात्यात जमा होणार आहे, असे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button