एसटीच्या चालक-वाहकांना कामावर असताना मोबाईल वापरास बंदी

मुंबई :- एसटीच्या चालक आणि वाहकांना कामावर असताना मोबाईलच्या वापरास बंदी घालणारे परिपत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे. दि. १ जानेवारी ते ६ जानेवारी २०२० या कालावधीत ‘विशेष मार्ग तपासणी’ मोहीम राबवावी आणि मोबाईल वापरणाऱ्या चालक, वाहकांची तपासणी करण्यात येऊन केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवावा, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. दि. २६ डिसेंबर २०१९ला हे परिपत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे.

ही बातमी पण वाचा : एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ

एसटी प्रशासनाच्या या नव्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांमधील रोषाचे वातावरण समाज माध्यमातून जाणवत असल्याचे आज शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. यानुसार, प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास चालक, वाहकांनी काय करावे? त्यांनी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे का? असे प्रश्न आता समाज माध्यमातून उपस्थित होत आहेत.