ST बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच; अनिल परब यांची स्पष्टोती

Anil Parab - ST Bus

मुंबई :- वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर केली आहे. हे निर्बंध २२ एप्रिल रोजी रात्री ८ ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. सामान्य नागरिकांना प्रवासालाही बंदी केली आहे. एसटी बस (ST Bus) केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच राहणार आहे. यासंदर्भाची माहिती परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

“जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेरदेखील चालतील; परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत. या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. आता सरकारने ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार, दोन्ही ठिकाणी एसटी चालतील, फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बस चालतील.” असे अनिल परब म्हणाले.

नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाही
“जिल्ह्याबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचे? कशा पद्धतीने ठेवायचे? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार आहे. एसटी संख्यादेखील कमी होईल; कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाही. नियमावलीचे तंतोतंत पालन केले जाईल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासी जाणार असतील तर सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल.” असेही परब यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, सर्व सरकारी कार्यालयांना १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. सोबतच, लोकलमधून प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घातली आहे. लग्नाबाबत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारकडून निर्बंध लागू केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button