SSC Result : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार!

SSC Result - Varsha Gaikwad

पुणे :- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी २८ मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर शासन निर्णय जाहीर केला. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून कामही सुरू केले. दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. दहावीच्या निकालासंदर्भातील शासन निर्णयानुसार शाळांकडून गुण नोंदविण्यात येत असल्याची माहिती आहे.

विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प आणि नववीच्या गुणांवर आधारित आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे वस्तुनिष्ठपणे निकाल जाहीर करावा, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेचे पालन न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

निकालासाठी समिती
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी शाळास्तरावर समिती स्थापन करावी लागेल. या समितीमध्ये मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षकांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांचे नववीचा निकाल, दहावीचे मूल्यांकन कागदपत्रे आणि उत्तरपत्रिका निकाल समितीने पडताळणी केल्यानंतर मुख्याध्यापकाच्या ताब्यात ठेवाव्या लागतील. याबाबत शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button