एसआरपीएफ जवानांना दिलासा ; बदलीसाठी १५ वर्षाची अट रद्द; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला यश

मुंबई :- राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली .

एसआरपीएफ जवानांच्या (SRPF Jawans) बदलीसाठी १५ वर्षाची अट होती. ती आता १२ वर्ष करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षावरून आता २ वर्षावर करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे (Aditya Thcakeray) यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या निर्णयासाठी आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या विनंतीवरून SRPF जवानांच्या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीवरून आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यानिर्णयामुळे SRPF जवानांची दिर्घकालीन मागणी पूर्ण झाली असून कर्तव्य बजावण्याबरोबरच एसआरपीएफ जवानांची सोय होणार आहे असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुंबईत ३ आठवड्यात सर्वांचे  लसीकरण पूर्ण करण्याचा आमच्याकडे रोडमॅप ;  आदित्य ठाकरेंची माहिती 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button