‘कंधार’ घटनेवर वेबसीरीज बनवत नसल्याचा श्रीराम राघवनचा खुलासा

Varun Dhawan - Sriram Raghavan

1999 मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणाची (Kandahar Hijack) घटना भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय मानला जातो. एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांची सुखरूप सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारला कुख्यात अतिरेक्याला सोडावे लागले होते. बॉलिवुडच्या (Bollywood) निर्मात्यांना हा विषय नेहमीच आकर्षित करीत आला आहे. त्यामुळेच यावर काही सिनेमे तयारही झाले आहेत. त्यातच यशस्वी दिग्दर्शक श्रीराम राघवन (Sriram Raghavan) कंधार घटनेवर वेबसीरीज निर्माण करणार असल्याची चर्चा बॉलिवुडमध्ये सुरु झाली होती. मात्र श्रीराम राघवनने असा कोणताही प्रोजेक्ट करीत नसून परमवीर चक्र विजेता अरुण खेतरपाल याच्या जीवनावर सिनेमा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

श्रीराम राघवन हा रामगोपाल वर्माचा सहाय्यक होता. त्यानंतर श्रीरामने स्वतंत्ररित्या अनेक हिट सिनेमे दिले. यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या आणि केवळ देशातच नव्हे तर परदेशातही प्रचंड कमाई करणाऱ्या ‘अंधाधुन’ सिनेमाचा समावेश आहे. या सिनेमानंतर अंधाधुनच्या निर्मात्यांसोबत कंधार घटनेवर वेबसीरीज बनवणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. याबाबत बोलताना श्रीराम राघवनने सांगितले, ही अत्यंत चुकीची बातमी आहे. मी अशा कोणत्याही प्रोजेक्टवर काम करीत नाही. या वेबसीरीजची निर्मिती अंधाधुनचे निर्माते करीत आहेत. मात्र त्यांच्या या प्रोजक्टमध्ये मी सामील नाही. मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्या अत्यंत तरुण वयात परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त शहीद अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकवर काम करीत आहे.

श्रीरामने पुढे सांगितले, गेल्या वर्षी मी या सिनेमावर काम सुरु केले होते. अरुण खेतरपालने अत्यंत तरुण वयात प्रचंड वीरता दाखवली होती. त्यामुळेच त्याला परमवीर चक्र देण्यात आले होते. त्यामुळेच त्याची जीवनगाथा पडद्यावर आणण्याची योजना आखली होती. ‘21’ असे नाव असलेल्या या सिनेमात अरुण खेतरपालची भूमिका साकारण्यासाठी वरुण धवनची (Varun Dhawan) निवड केली होती. वरुणही ही भूमिका करण्यास अत्यंत उत्सुक आहे. एप्रिलमध्ये तयारी सुरु करून आम्ही सप्टेंबर 2020 मध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार होतो. पण कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. या सिनेमाच्या शूटिंगसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमधील विशिष्ट हवामानाची आवश्यकता आहे. त्यामुळे आता मला सप्टेंबर 2021 पर्यंत थांबावे लागणार असल्याचेही श्रीराम राघवनने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER