अजित पवारांना म्हणाले होते ‘स्टेपनी’; श्रीनिवास पवार, म्हणतात ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’

Sanjay Raut-Shrinivas Pawar-Ajit Pawar

पुणे :- लोकमत पुरस्कार सोहळ्यामध्ये काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी विविध समकालीन राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांच्याकडून अनेक वादग्रस्त विधानंही केलीत. त्यामुळे ते पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्रस्थान बनले आहे.

सरकार चालवायला उद्धव ठाकरेंच योग्य व्यक्ती आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारची स्टेपनी आहे असे विधान संजय राऊत यांनी काल मुलाखतीत केले. त्यांच्या या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांचे अजित पवारांना स्टेपनी उल्लेखणे हे विनाशकाले विपरित बुद्धीचे लक्षण असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत –

सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही. अजित पवारांना घेऊन गेले त्यावेळी मला काहीच वाटलं नाही, मी निर्ढावलेला माणूस आहे. अजित पवारांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केलं, असं राऊत म्हणाले.

अजित पवार स्टेपनी, तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती – संजय राऊत