श्रीनिवास MMRDA चे आयुक्त, तर म्हैसकर गृहनिर्माण प्रधान सचिव

SVR Srinivas - Milind Mhaiskar

मुंबई : आर. ए. राजीव यांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदाचा महानगर आयुक्त म्हणून कालावधी संपुष्टात आल्याने हे पद रिक्त झाले. या पदाचा तात्पुरता कार्यभार हा सोनिया सेठी यांच्याकडे देण्यात आला होता. पण आता शासनाने MMRDA महानगर आयुक्त पदासाठी एस. व्ही. आर. श्रीनिवास (S.V.R. Srinivas) यांची नियुक्ती केली आहे. तसेच प्रधान सचिव गृहनिर्माण पदाचा कार्यभार हा मिलिंद म्हैसकर (Milind Mhaiskar) यांच्याकडे देण्यात आला आहे.

MMRDA आयुक्त असलेले राजीव यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यांच्या सेवा कालावधीत वाढ झाली होती. त्यांच्या मुदतवाढीच्या शेवटच्या दिवशीच मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ साठीच्या चाचणीचा कार्यक्रम झाला. त्याच दिवशी राजीव यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कारही केला. त्यांच्या जागी आता श्रीनिवास यांची महानगर आयुक्तपदी निवड झाली आहे. त्यांनी याआधी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले.

शिवाय त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचीही जबाबदारी हाताळली. तसेच ठाकरे सरकारमध्ये गृहनिर्माण विभागाची प्रधान सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. मिलिंद म्हैसकर प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव (गृहनिर्माण) या पदावर करण्यात आली आहे. म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button