श्रीकांत दातार होणार हार्वर्ड विद्यापीठाचे नवे अधिष्ठाता

Srikanth Datar

दर्जासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे (Harvard University) अधिष्ठाता (डीन) म्हणून श्रीकांत दातार (Srikant Datar) यांची निवड झाली आहे. ते १ जानेवारी २०२१ पासून पदभार स्वीकारणार आहेत. भारतीयांसाठी आणि त्यातही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

श्रीकांत दातार हार्वर्डचे दुसरे भारतीय वंशाचे अधिष्ठाता असतील. त्यांच्या आधी नितीन नोहरिया हे हार्वर्डचे अधिष्ठाता होते. हार्वर्डचे अध्यक्ष लॅरी बॅकोव्ह यांनी ही माहिती दिली. हार्वर्ड विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी सलग दुसऱ्यांदा भारतीय वंशाची व्यक्ती असणार आहे. श्रीकांत दातार हे हार्वर्डमध्येच हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर श्रीकांत दातार यांचे अभिनंदन केले आहे.

परिचय

श्रीकांत दातार यांनी १९७३ साली मुंबई विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) झाल्यानंतर अहमदाबादच्या आयआयएममध्ये प्रवेश घेतला. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केल्यानंतर पीएच.डी.साठी ते स्टॅनफोर्डला गेले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी-अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. केली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात काम सुरू केले. गेली अनेक वर्षे श्रीकांत दातार हार्वर्ड विद्यापीठात बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER