श्रीलंकन क्रिकेट संघाचा ‘वजा’ गुण मिळवण्याचा विक्रम

श्रीलंकन (Srilanka) क्रिकेट संघाने एक अशी नोंद केली आहे, जी कोणत्याच संघाला नको असेल. आयसीसीच्या वर्ल्ड कप सुपर लीग (ICC World Cup Super league) स्पर्धेत लंकन संघाच्या नावावर आता ‘उणे दोन’ (Minus Two) गुण आहेत आणि बहुधा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक पातळीवरील एखाद्या स्पर्धेत कुण्या संघाच्या नावावर उणे गुण लागले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात संथ गोलंदाजीसाठी त्यांना करण्यात आलेल्या दंडाने हा विक्रम त्यांच्या नावावर लावला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नियोजित वेळेत दोन षटके कमी टाकली होती. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीगच्या प्लेइंग कंडिशन्समनधील नियम १२.९.१ नुसार त्यांना प्रत्येक संथ षटकासाठी एका गुणाचा दंड करण्यात आला आणि त्यामुळे आधीच शून्य गुणांवर असलेल्या श्रीलंकेच्या नावावर आता ‘वजा दोन’ गुण लागले आहेत.

यासह श्रीलंका आता तळाला १० व्या स्थानी आहे. त्यांनी सुपर लीगमधील आतापर्यंतचे त्यांचे सर्वच्या सर्व तीन सामने गमावले आहेत. याशिवाय श्रीलंकन संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या ४० टक्के रकमेचाही दंड करण्यात आला आहे. श्रीलंकेचा अष्टपैलू धनुष्का गुणतिलके याला निकोलस पूरणशी झालेल्या वादासंदर्भात समजही देण्यात आली आहे.

सुपर लीगमधील ताजी स्थिती
संघ ——– सामने — विजय — गुण
ऑस्ट्रेलिया — ६ —- ४ —— ४०
बांगलादेश — ३ —- ३ ——- ३०
इंग्लंड ——— ६ —- ३ —— ३०
अफगणिस्तान – ३ — ३ ——३०
वेस्ट इंडिज — ६ —-३ ——- ३०
पाकिस्तान — ३ —- २ ——– २०
झिम्बाब्वे —– ३ —– १ ——- १०
आयर्लंड —— ६ —– १ ——-१०
भारत ——— ३ —– १ ——- ०९
श्रीलंका —— ३ —– ० ——– -२

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER