वर्ल्ड कप २०११ च्या फायनलवर फिक्सिंगचा आरोप, श्रीलंका गुन्हेगारी तपास करेल

World Cup 2011

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी असा दावा केला की, भारताला विजय देण्यासाठी श्रीलंकेने २०११ वर्ल्ड कपची फायनल विकली होती. श्रीलंके सरकारने या प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना क्रीडा मंत्रालयाचे सचिव केडीएस रुवाचंद्र म्हणाले आहेत की, “गुन्हेगारी तपास सुरू झाला आहे.”

या महिन्याच्या सुरूवातीलाच या विषयावर चर्चा सुरू झाली होती, जेव्हा अलुथगामगे (त्यावेळी श्रीलंकेचे क्रीडामंत्री होते) यांनी एका स्थानिक टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा अंतिम सामना फिक्स केला गेला होता. अलुथगामगे म्हणाले होते की, “आज मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही २०११ चा वर्ल्ड कप विकला होता, मी जेव्हा क्रीडामंत्री होतो तेव्हा असे बोललो होतो.”

न्यूज एजन्सी एएफपीने श्रीलंकेच्या स्थानिक अहवालांचा हवाला देत असा दावा केला आहे की श्रीलंकेचा माजी कर्णधार अरविंदा डीसिल्वा (जो २०११ च्या फायनलसाठी संघाचा मुख्य निवडकर्ता होता) यांना मंगळवारी चौकशी करणार्‍यांच्या मुलाखतीसाठी बोलावले होते.

नुकत्याच झालेल्या संडे टाईम्सच्या एका कॉलम मध्ये डीसिल्वा यांनी हे आरोप फेटाळून लावत एसएलसी, बीसीसीआय आणि आयसीसीला या विषयावरील शंका दूर करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन दिले आहे. त्यांनी आपल्या कॉलम मध्ये लिहिले आहे की, “आम्ही लोकांना सर्वकाळ खोटा बोलू देऊ शकत नाही. मी सर्वांना विनंती करतो, आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीला त्वरित याची चौकशी करावी.”

२०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने फलंदाजीची निवड केली. महेला जयवर्धनेने शानदार शतक झळकावले आणि भारताला २७५ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यास सांगण्यात आले. गौतम गंभीर (९७) आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी (९१) यांच्या शानदार प्रदर्शनमुळे भारताने ट्रॉफी जिंकण्यासाठी लक्ष्य ६ गडी राखून पूर्ण केले. १९८३ नंतर भारताने दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER