IPL 2020: हैदराबादने हा सामना ६९ धावांनी जिंकला, किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा सामन्यात पाचवा पराभव

SRH registers emphatic 69-run win over struggling KXIP

आयपीएलच्या १३ व्या सत्राचा २२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. हैदराबादने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि जॉनी बेअरस्टो (९७) आणि डेव्हिड वॉर्नर (५२) यांच्या मदतीने स्कोअरबोर्डवर २०१/६ धावा फटकावल्या. हैदराबादने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सहा सामने खेळले असून तीन जिंकून तीन पराभव स्वीकारले आहेत. त्याचबरोबर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यामध्ये पंजाबला एकामध्ये विजय मिळाला आहे आणि पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

सनरायझर्स हैदराबादने ६९ धावांच्या मोठ्या फरकाने मिळवला विजय
टी. नटराजनने दुसर्‍या चेंडूवर शेल्डन कोटरेलला क्लीन बोल्ड केले आणि त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगला डेव्हिड वॉर्नरच्या झेलबाद करून ६९ धावांच्या विशाल फरकाने सामना जिंकला. पंजाब १६.५ षटकांत १३२ धावांवर सर्वबाद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER