‘स्पुतनिक व्ही’ लस १ मे रोजी भारतात आणणार; लसीकरण मोहिमेला येणार वेग

Sputnik V Vaccine

नवी दिल्ली : या कोरोना विषाणूविरोधात (Coronavirus) लढण्यासाठी देशात कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहीम अगदी वेगाने सुरू आहे. येत्या १ मेपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. अशातच भारताला नवी रशियन ‘स्पुतनिक व्ही’ ही लस उपलब्ध होणार आहे. या लसीची पहिली खेप भारतात १ मे रोजी पोहचणार आहे. याबाबतच माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रीव (Kirill Dmitriev) यांनी दिली आहे. मात्र, या पहिल्या खेपेत भारतात किती लस आणल्या जाणार आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, भारतात १ मे रोजी ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे पाच कोटी डोस आयात होणार असल्याची माहिती आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या माध्यामातून या लसीचे डोस भारतात आयात होत आहेत. काही दिवसांनंतर या लसीला भारतात निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने पाच मोठ्या भारतीय निर्मात्यांना दरवर्षी ८५ कोटींहून अधिक लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. भारतात लवकरच या लसीची निर्मिती सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशात आरोग्य सुविधांचा मोठी तुटवडा जाणवत आहे. या संकटाच्या काळात अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या देशांनी भारताला तत्काळ मदत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतातील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच मदतीसाठी एक्सपर्ट पाठवणार असल्याचेही RDIFचे प्रमुख किरील दिमित्रीव यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत अ‍ॅस्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. तर भारत बायोटेकने विकसित केलेली कोवॅक्सिनही लसीकरण मोहिमेत नागरिकांना दिली जात आहे. परंतु, ‘स्पुतनिक व्ही’ ही तिसरी लस भारतात आणल्याने लसीकरण मोहिमेला अधिक वेग येणार आहे. दरम्यान, देशात प्रत्येक महिन्यात ७० मिलियन डोस बनवण्याची योजना आखली जात आहे.

जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाप्रमाणे रशियाने या लसीचे नाव ‘स्पुतनिक व्ही’ ठेवले आहे. ही लस मॉस्कोमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, “माझ्या मुलीने या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. सोबतच या लसीला ५९ देशांमध्ये वापरासाठी परवानगी मिळाली आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button