आता सिरम इन्स्टिट्यूटमध्येही होणार ‘Sputnik-V’ लसीची निर्मिती !

Sputnik-V vaccine-Serum Institute

पुणे :- देशातील कोरोना रुग्ण (Corona Patient) संख्या आटोक्यात असली तरी लसीकरण मोहिम मंद आहे. मात्र, लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी रशियाने मोठा पुढाकार घेतला आहे. रशियाने ‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे (Sputnik-V vaccine) तंत्रज्ञान सिरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) देण्याचे मान्य केले आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये आता कोविशील्डसह ‘स्पुतनिक-व्ही’ लसही तयार होणार आहे.

यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटने रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ लसीच्या चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली. या लसीला DCGIने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशील्ड लसीचे उत्पादन होत आहे. डॉ. रेड्डीज लॅबमध्ये ‘स्पुतनिक-व्ही’ लसीची निर्मिती होत आहे. या रशियन लसीचा वापर १४ मेपासून सुरू झाला आहे. आता ५० हून अधिक देशांमध्ये या लसीला नोंदणीकृत केले आहे. एका अभ्यासानुसार, ‘स्पुतनिक-व्ही’ लसीच्या दोन्ही डोसची कार्यक्षमता ९७.६ टक्के इतकी आहे.

स्पष्टीकरण

यापूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले की, जूनपर्यंत १० कोटी कोविशील्ड लसीचे डोस तयार होतील. सध्या ‘नोव्होवॅक्स’ लसीची निर्मिती केली जात आहे. यावर्षी भारत सरकारने लसीकरण मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत देशात २२ कोटी लस दिले आहेत. जुलै, ऑगस्टपर्यंत दर महिन्यात २० ते २५ कोटी डोस उपलब्ध होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button