भारतात आणखी पाच नवी लस येणार; ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता!

Sputnik V new vaccine for corona vaccine

नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccine) मोहीम सुरू आहे. दरम्यान, लसीच्या नव्या टप्प्यांमध्ये लस घेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसींचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इतर लस निर्मितींचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ३ महिन्यांत भारतात आणखी पाच कंपन्यांची नवी लस येणार आहे. यातच रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वृत्त एएनआयने दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात सध्या ‘कोविशिल्ड’ (Covishield) आणि ‘कोवॅक्सीन’ (Covaccine) या दोन लस उपलब्ध आहेत. या लसींचे उत्पादन भारतातच होत आहे. यानंतर येत्या ३ महिन्यात आणखी ५ लस भारतात दाखल होणार आहेत. यामध्ये ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ही लस (डॉ. रेड्डीज या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ (बायोलॉजिकल ई या फार्मा कंपनीच्या सहकार्याने), ‘नोवाव्हॅक्स’ (ही लस सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने) तसेच ‘झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक’ स्वतः एक लस बाजारात आणणार आहे.

जगभरात जवळपास २० कोरोना प्रतिबंधक लसींवर विविध ‘क्लिनिकल आणि प्रि-क्लिनिकल’ पातळ्यांवर चाचण्या सुरू आहेत. यांपैकी रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला प्रथम परवानगी मिळणार आहे.

पुढील १० दिवसांत ‘स्पुटनिक व्ही’ला देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच सुरक्षा आणि प्रभावीपणा हा केंद्र सरकारचा प्राथमिक काळजीचा विषय आहे.

‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’चा भारतीय कंपन्यांसोबत करार

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (RDIF) भारतीय फार्मा कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. यामध्ये हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, हेटरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिअस बायोफार्मा आणि विक्रो बायोफार्मा यांच्यामार्फत लसीचे डोस तयार करण्यासाठी करार केला आहे. या सर्वांची मिळून ‘स्पुटनिक व्ही’चे देशात ८५० मिलियन डोस तयार करण्याची क्षमता आहे. यामुळे भारतात ‘स्पुटनिक व्ही’ ही कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

‘या’ ५ लस कधी येणार?

या सर्व लसी कधीपर्यंत भारतात उपलब्ध होतील? या प्रश्नावर उत्तर देताना टॉप अधिकाऱ्यांनी सांगितले की, “स्पुटनिक व्ही’ जूनपर्यंत बाजारात येईल, ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ आणि ‘कॅडिला झायडस’ ऑगस्टपर्यंत येईल, ‘नोवाव्हॅक्स’ सप्टेंबरमध्ये तर ‘नाझल व्हॅक्सिन’ ऑक्टोबरपर्यंत बाजारात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button