स्पुतनिक व्ही’ पाठोपाठ ‘Sputnik Light’ भारतासाठी आशेचा किरण; लसीचा तुटवडा होणार दूर

sputnik v - Maharashtra Today

नवी दिल्ली : भारतात रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ लशीला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. या पाठोपाठ आता रशियाने ‘स्पुतनिक लाइट’ लस तयार केली आहे. या लशीला रशियाने मंजुरी दिली आहे. या लशीचा फक्त एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे ‘स्पुतनिक व्ही’ पाठोपाठ जर ‘स्पुतनिक लाइट’लाही भारतात मंजुरी मिळाली, तर लशीचा तुटव़डा दूर होणार. तसेच लसीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.

रशियाने कोरोना लस ‘स्पुतनिक लाइट’ला मंजुरी दिली आहे. यवबाबतची माहिती रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने दिली आहे. मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. ‘स्पुतनिक व्ही’ ची ही दुसरी लस आहे. ही लस कोरोनाविरोधात ७९.४% प्रभावी आहे. काही लशींच्या दोन डोसपेक्षाही प्रभावी या लशीचा एक डोस आहे, असे रशियाने स्पष्ट केले आहे. या लशीच्या एका डोसशी किंमत १० डॉलर्स म्हणजे ७३७ रुपयांपेक्षाही कमी आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ‘स्पुतनिक लाइट’चे सिंगल डोस ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. ह्या लसीचा २८ दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस ७९.४% प्रभावी असल्याचे समजले. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलआधीच घेतले आहे. यात ७ हजार कांचा समावेश होता. याचा शेवटचा निकाल या महिन्यानंतर येईल. ‘स्पुतनिक व्ही’ला भारतात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील लशीचा तुटवडा पाहता सिंगल डोस ‘स्पुतनिक लाइट’लाही भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button