स्पृहाने दिला चाहत्याला असाही मार

spruha joshi

कलाकारांचे चाहते त्यांचं कौतुक करत असतातच पण कधीकधी सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारे फोटो, काही पोस्ट यावरून कलाकारांना ट्रोल करणाऱ्याचा देखील सामना करावा लागतो. मात्र आजकाल अनेक कलाकार या ट्रोलर्स ना चांगलाच दणका देत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) हिने देखील तिला टोमणा मारणाऱ्या एका ट्रोलर ला शाब्दिक चिमटा काढत वठणीवर आणले आहे.

सध्या कलाकाराची मुलाखत म्हटले की त्यामध्ये एक प्रश्न हमखास असतो आणि तो म्हणजे तुम्ही ट्रोलरशी कसा सामना करता. सहाजिकच स्पृहाला देखील हा प्रश्न एका मुलाखतीत विचारला. मुलाखतीत विचारलंच नाही तर तिच्या पोस्टवर आलेला मेसेज तिला वाचून दाखवला. असं झालं होतं की एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने स्पृहाने तिचे फोटो सेशन सोशल मीडियावर पोस्ट केलं. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होतीस पण तिला ट्रोल करणाऱ्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे किंवा तिचा ड्रेस कडे न जाता तिच्या पायातील उंच टाचेच्या सॅंडलकडे गेलं. त्यावरूनच त्या चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट करताना तुझी उंची कमी आहे म्हणून तू उंच टाचेची सॅंडल घातले आहेस का? आणि ते घालायचे असेल तर आम्हाला दिसणार नाहीत अशा पद्धतीने झाक. असा टोमणा मारला.

मुळात स्पृहा ही उत्तम कवयित्री आहे. शब्दांशी खेळणे काय असतं आणि शब्दांच्या सोबत भावना गुंफणं काय असते हे तिच्या इतक दुसरा कुणाला ठाऊक असणार. त्यामुळे जेव्हा या ट्रोलर्सला काय सांगशील असा प्रश्न जेव्हा मुलाखतकाराने स्पृहाला विचारला तेव्हा हा खरेतर ती ट्रोलर्सच्या बौद्धिक उंचीवर हसली. तिने त्याला एकाच शब्दात सुनावलं की उंच टाचांचे सँडल ही कमी उंची असलेल्या मुलींसाठी एक सोय आहे. पण त्यावरून जर तुम्ही एखाद्या कलाकाराला ट्रोल करत असाल तर यावरून तुमचीच बौद्धिक उंची किती खुजी आहे हे दिसून येते. एखाद्या माणसाला त्याच्या शारीरिक उंचीवरून ट्रोल करणे खूप चुकीचे आहे हे त्याला कळत नाही आणि त्या व्यक्तीला काही सांगणे हा आपलाच मूर्खपणा ठरेल. तेव्हा ज्यांना बौद्धिक उंची नाही त्यांनी इतरांच्या शारीरिक उंची बद्दल आपले मत देऊ नये अशा शब्दात स्पृहाने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.

मुळातच स्पृहा ही रोखठोक मुलगी आहे हे जवळपास इंडस्ट्रीत सगळ्याना माहिती आहे. कवी मनाची माणसं खूप संवेदनशील, जास्त न बोलणारी असतात असा एक समज आहे. पण स्पृहा इतकी सशक्त कवयत्री आहे तितकीच ती समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर, चुकीची मानसिकता असलेल्या लोकांवर नेहमीच व्यक्त होत असते.

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत स्पृहाने साकारलेल्या कुहू या भूमिकेत अभिनेत्री आणि कवयित्री अशा दोन्ही भूमिका तिला एकाच वेळी जगायला मिळाल्या. मुळची पुण्याची असलेली स्पृहा कामानिमित्ताने मुंबईची मुलगी झाली असली तरी तिच्यात पुणेरी बाणा आणि शब्दाला शब्द देण्याची कला नेहमीच जागृत असते. मोजकं आणि नेमकं काम हा तिचा विशेष गुण आहे. त्यामुळे आजपर्यंतची तिच्या मालिका असो नाटक असो किंवा सिनेमा हे वेगळ्या विषयावर, वेगळ्या मांडणीचे असल्याचा आपल्याला बघायला मिळतात. स्पृहाचा कवितेचा अभ्यास आणि आवाका इतका मोठा आहे की इंडस्ट्रीमधील कोणत्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये देखील स्पृहाची कविता ऐकण्याचा आग्रह नेहमीच केला जातो. सोशल मीडियावरती ती जितके फोटो आणि कमेंट यामुळे प्रसिद्ध आहे तितकीच लोपामुद्रा या खास कवितांना वाहून घेतलेल्या पेजवरही स्पृहाचे अनेक चाहते आहेत. तिच्या चारोळ्या पासून मंथन करायला लावणाऱ्या कविता यांचा एक वेगळा चाहता वर्ग देखील आहे. आणि त्यामुळेच जेव्हा, उंच टाचचे सैंडल घालायचे असतील तर घाल पण ते आम्हाला दिसणार नाहीत असे घाल अशा पद्धतीने एका फालतू विषयावर ट्रोल करणाऱ्या सोशल नेट कर्याला स्पृहाने काढलेला शाब्दिक चिमटा नक्कीच झोंबला असणार यात शंका नाही.

ही बातमी पण वाचा : आता मला पम्मी म्हणायचं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER