वसंत ऋतुचर्या

Spring Season

वातावरणातील थंडी कमी होऊन सूर्य हळूहळू तापायला लागला, की वसंतऋतूची सुरुवात जाणवायला लागते. शीत ऋतूमधील पानगळ संपून झाडांना नवीन पालवी फुटलेली  असते. दाही दिशांना अशोक, आंबा, पळस बहरलेला दिसू लागतो. या वेळी शिशिर-हेमंत ऋतूमध्ये संचित झालेला कफ सूर्याच्या उष्णतेने पातळ होतो. त्यामुळे कफविकार, अग्नी मंदावणे अशा व्याधी उत्पन्न होतात. हे सर्व टाळण्याकरिता ऋतुचर्येत बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेदात (Ayurveda) वसंतऋतूची काय माहिती आहे ते बघूया –

  • सकाळी लवकर उठावे. कडू-तुरट रसाचे  चूर्ण अथवा वनस्पतीच्या काडीने दंतधावन करावे. हे रस कफ कमी करणारे असतात. उदा. नीम, करंज, बाभूळ, खदीर इ.
  • कवल धारण करावे. उपरोक्त काढ्यांनी गुळण्या कराव्या जेणेकरून मुख, कंठ भागातील कफ निघण्यास मदत होते.
  • व्यायाम, अभ्यंग उद्वर्तन ( उटणे) करून कोमट पाण्याने स्नान करावे.
  • दिवसभरात नागरमोथा, सुंठ याचा काढा, डाळिंबाचे  सरबत, मधपाणी घ्यावे जेणेकरून जाठराग्नी  व पाचन चांगले राहण्यास मदत होईल. कफाचा त्रास होत नाही.
  • आहारात लवकर पचणारे व स्नेहरहित रुक्ष पदार्थ असावे. उदा. जव, जुने तांदूळ, गहू, मूग यांचा समावेश असावा. नवीन धान्य कफ वाढविणारे असतात. त्यामुळे ते घेऊ नये. नाइलाज असल्यास भाजून घ्यावे व नंतरच आहारात समावेश करावा.
  • आंबा, आंब्याचा रस सेवन करावा.
  • आंबट दही, तेल, दूध, दुधाचे पदार्थ आहारात कमी किंवा वर्ज्य करावे. हे सर्व अम्ल, मधुर स्निग्ध पदार्थ कफ वाढविणारे असल्याने कफविकार बळावतात.
  • दिवसा झोपू नये.
  • या काळात कफविकार होऊ नये व प्रकुपित कफ शरीराबाहेर काढण्याकरिता वमन व रुक्ष नस्य या पंचकर्माचा नक्कीच अवलंब करावा.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER