राष्ट्रवादी परिवाराचा आणि पवारांच्या विचारांचा प्रसार करा : जयंत पाटील

Jayant Patil-Sharad Pawar

नागपूर :- विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र या गोष्टी मागे टाका. ‘वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है’ असं सांगत पक्षाचे बूथ संघटन अधिक मजबूत करा… जोमाने कामाला लागा… राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा… पवारसाहेबांच्या विचारांचा प्रसार करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. आज ही यात्रा नागपुरात पोहोचली. यावेळी जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीणचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

यावेळी नेत्यांची खरी ताकद हे कार्यकर्ते असतात. आपल्या नेत्याच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती, अनिलबाबूंचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षम उभे राहतात हे पाहून समाधान झाले, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे कौतुक केले.

आगामी काळात नागपूर शहरात निवडणुका होणार आहेत. मागे पक्षाला पराभव पत्कारावा लागला याची आठवण करून देतानाच पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगले कामेही करत आहोत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठतोय. त्यामुळे विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करा, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जावेद हबीब, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER