शेतकऱ्यांच्या सन्मानात खेळाडू परत करणार राष्ट्रीय सन्मान

Pargat Singh To Return Padma Shri

नवी दिल्ली : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या (Farmers Agitation) समर्थनात बऱ्याच नावाजलेल्या खेळाडूंनी आपले राष्ट्रीय सन्मान परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता माजी कर्णधार परगतसिंग (Pargat Singh) यांची भर पडली आहे. परगतसिंग यांना 1998 मध्ये पद्मश्री (Padmashree) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्याआधी अर्जुन पुरस्कार विजेते सज्जनसिंग चीमा, राजबीर कौर, पद्मश्री सन्मानीत कर्तारसिंग, ऑलिम्पिक पदक विजेते गुरुमैलसिंग, माजी क्रिकेट प्रशिक्षक राजिंदरसिंग यांनीसुध्दा असाच निर्णय जाहीर केला आहे. या सर्व खेळाडूंनी आपण केंद्र सरकारला आपले सन्मान 5 डिसेंबर रोजी परत करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे सर्व राष्ट्रपती भवनाबाहेर आपले सन्मान ठेवणार आहेत.

दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले परगतसिंग हे काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यांना अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू सज्जनसिंग चीमा यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्याच्या आणि अश्रूधुराचा मारा करण्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलेय की आमच्या ज्येष्ठांची व बांधवांची आब्रु घेतली जात असेल तर आम्ही पुरस्कार व सन्मानांचे काय करणार? आम्हाला असे पुरस्कार नको आहेत म्हणून आम्ही ते परत करणार आहोत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री व अकाली दल प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनीसुध्दा आपला पद्मविभुषण पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER