शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ उत्स्फूर्त प्रतिसाद, अनेक ठिकाणी चक्काजाम, रेल्वेही रोखली

Farmer Protest - Maharastra Today

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असून, उत्तरेकडे अनेक ठिकाणी चक्काजाम आणि रेल्वे रोखण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवाहनानंतर माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे. भारत बंदचे पडसाद उत्तर भारतात दिसू लागले आहेत. दिल्ली-गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी पुन्हा एकदा हायवे बंद केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टिकरी बॉर्डर, पंडित श्री राम शर्मा, बहादुरग़ सिटी आणि ब्रिगेडिअर होशियार सिंह मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद असल्याची माहिती, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER