‘माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली, महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं’ – अनुराग कश्यप

Anurag Kashyap-Uddhav thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार यावर आपली भूमिका मांडत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “मी महाराष्ट्रात आनंदी आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो, असं मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं. तो एका मुलाखती दरम्यान बोलत होता.

अनुराग कश्यप म्हणाला, मी कोणाच्याही बाजूने बोलणार नाही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. मी येथे मोकळ्यामनाने माझी मतं व्यक्त करु शकतो. मागील काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. असं अनुराग कश्यपने म्हटले आहे.

सरकार सध्या लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन हटवून बॉलिवूडवर केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नसून सध्याचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्या विरोधात आहे, असंही मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER