सोनिया, राहुल आणि प्रियंकांची एसपीजी सुरक्षा काढणार

केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन फोर्स) सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुरक्षा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षा प्रधान करण्यात आली आहे.


नवी दिल्ली :- केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन फोर्स) सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुरक्षा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षा प्रधान करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या सुरक्षा समीक्षा कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत असा निष्कर्ष निघाला की, गांधी कुटुंबाला आधीच्या इतका धोका नसल्याने झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. गृह मंत्रालय नेत्यांच्या सुरक्षेबाबत असा आढावा घेत असतो व त्यानुसार नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत बदल करत असतो.

ही बातमी पण वाचा : पवारांनी सोनियांना दिले, काँग्रेस आणि सेनेच्या संबंधाचे पुरावे; काँग्रेसचा पाठिंबा मिळणार?

असे कळते की बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, अनेकदा सूचना देऊनही गांधी परिवाराचे सदस्य परदेशात एसपीजी सुरक्षा व्यवस्थेसोबत जात नाहीत.

याचा अर्थ असा आहे की, त्यांना एसपीजी सुरक्षेची गरज नाही. काँग्रेसने या निर्णयाचा विरोध केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खुर्शीद म्हणाले की – हा निर्णय राजकीय सुडाच्या भावनेने घेण्यात आला असून दुर्दैवी आहे.