‘महाराष्ट्र मॉडेलनुसार प्रसिद्धीसाठी पैसे उधळा, संपर्क साधा…बेस्ट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री’

Maharashtra Today

मुंबई : देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक हृदयद्रावक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात कोरोनामुळे पालकांच्या मृत्यूनंतर मुले अनाथ झाली आहेत. मध्य प्रदेशचे शिवराज सरकार अशा मुलांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. आज मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chouhan)यांनी अशा मुलांना महिन्याला 5000 रुपये पेन्शन जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी युट्युब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमांवर वर्षाला तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. आणि या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अहो शिवराज सिंहजी अनाथांना कसले पैसे वाटतायत, महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, जनसंपर्क आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा. अधिक माहितीसाठी सम्पर्क राज्याचे बेस्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, असे म्हणत भातखळकर यांनी ट्विट केले आहे. तसेच पैसे जनतेचे जीव वाचवण्यासाठी खर्च करायचे नाहीत, फक्त प्रसिद्धीवर करायचे हे धोरण असल्यामुळे १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण थांबवण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे. लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा जनसंपर्क झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल, असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.

सोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या मुद्द्यावर हात घालत महाराष्ट्र मॉडेलवर निशाणा साधला. महाराष्ट्र मॉडेल…

सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल सामान्य जनतेच्या जीवीताची सुरक्षा कोणी करायची? अर्थात राज्य सरकार खंडणी वसुलीत गर्क असेल तर कायदा सुव्यवस्थेबाबत यापेक्षा वेगळी अपेक्षा आपण काय करणार?, असे म्हणत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button