पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर हालचालींना वेग, अजितदादांसह नेतेमंडळी भेटीला

Sharad Pawar & Ajit Pawar

मुंबई :- कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून शिवसेनेवर आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी सांयकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे.

आज सकाळपासूनच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ये-जा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळीच सिल्वर ओकवर दाखल झाले आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पोहोचले. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नुकताच भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी पवारांची भेट घेतली. ही सर्व नेतेमंडळी पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button