‘स्पीचलेस’ सीसीपासचा नदालवर ‘बोलका’ विजय

Speechless CCP's 'Bolka' victory over Nadal

टेनिस जगतात मोठी उलथापालथ सुरू आहे. सिमोना हालेप, अॅशली बार्टी, डॉमिनीक थीम व ग्रिगोर दिमीत्रोव्ह यांना पराभवाचे धक्के बसल्यानंतर आता ग्रीसच्या स्टेफानोस सीसीपासने (Stefanos Tsitsipas) कम्माल केली. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील (Australian Open) सर्वात धक्कादायक विजय नोंदवतांना त्याने जगातील नंबर दोन राफेल नदालसारख्या (Rafael Nadal) ग्रेट खेळाडूचे आव्हान संपवले, तेसुद्धा पहिले दोन सेट गमावून ०-२ असा पिछाडीवर पडल्यावर. ग्रँड स्लॅम स्पर्धेत आतापर्यंत नदालविरुध्द अशी मुसंडी फक्त एकच खेळाडू, (फॅबियो फॉग्नीनी २०१५ ची युएस ओपन) मारू शकला होता आणि आता सीसीपास हा ०-२वरुन नदालविरुध्द ३-२असा जिंकणारा एकूरण तिसरा आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांतील केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. फॉग्नीनी व सीसीपासशिवाय नदालला ०-२ पिछाडीवरुन मात देणारा तिसरा खेळाडू आहे रॉजर फेडरर ज्याने २००५ च्या मियामी ओपनमध्ये हा कारनामा केला होता.

याप्रकारे अक्षरश: ‘स्पीचलेस’ कामगिरी करताना स्टेफानोस सीसीपासने ३-६, २-६, ७-६ (४) , ६-४, ७-५ असा विय मिळवला आणि तो दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला. योगायोगाने मेलबोर्नच्या याच कोर्टवर रॉजर फेडररला नमवून सीसीपासने पहिल्यांदा जगाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले होते.

साहजिकच या अविश्वसनीय विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सीसीपासकडे शब्द नव्हते. तो म्हणाला, ‘ ‘I’m speechless, My tennis speaks out for itself.’ आता उपांत्य फेरीत त्याचा सामना दानील मेद्वेदेवशी होणार आहे.

या अविश्वसनीय कमबँकची संधी सीसीपासला तिसऱ्या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये तेंव्हा मिळाली जेव्हा टाय ब्रेकच्या सुरुवातीलाच नदालने त्याच्याकडून अपेक्षीत नसलेल्या तीन चुका केल्या. त्याचा पुरेपूर फायदा सीसीपासने उचलला. शेवटच्या दोन सेटमध्ये त्याने आपल्या सर्वीसवर ८४ टक्के गुण कमावले आणि २७ विनर फटकेही लगावले. त्याआधारे हार्डकोर्टवर त्याने नदालविरुध्दच्या पाच सामन्यांतील आपला पहिलाच विजय नोंदवला.

मी स्वत: ला शांत व संयमात राखण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही सामन्यात मी हे करु शकलो नव्हतो. मी ज्या पध्दतीनेे खेळलो, अक्षरश: एखाद्या पक्षासारखा मी तरंगत बाहेर पडलो त्याचा मला आनंद आहे असे सीसीपासने म्हटले आहे. गेल्यावर्षी याच स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नदालने त्याचे सरळ सेटमध्ये आव्हान संपवले होते. तो हिशोब आज सीसीपासने चुकता केला.

नदाने येथे तिसरा सेट गमावण्याआधी ग्रँड स्लॅम स्पर्धात सलग ३५ सेट जिंकलेले होते. पण सीसीपासने ती मालिका खंडीत करताना नदालवर आठ सामन्यांतला दुसरा विजय नोंदवला. या स्पर्धेत गेल्या चार वर्षात तिसरयांदा नदाल उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER