पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळण्याची खात्री, दानवेंचा पवारांना टोला

Raosaheb Danave-Sharad Pawar

औरंगाबाद : भर पावसात उभे राहून भाषण केल्यास यशाची हमखास खात्री असते,असा खोचक टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर लगावला. आता मी देखील पावसात भाजून भाषण केलं. पुढच्या वेळेस मला हमखास यश मिळणार, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्याहस्ते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं. दरम्यान, कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला जोरदार सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा खोचक टोला रावराहेब दानवे यांनी पवारांना लगावला. आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

ह्या बातम्या पण वाचा  :

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टोलेबाजी केली. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोघांच्या ( शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) हातात आहे. आणि तिसरा पार्टनर काँग्रेस मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, अशी सूचना करत आहे. दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी अनियंत्रित होऊन लवकरच झाडाला धडकणार आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे परवाना नाही की इन्शुरन्स सुद्धा नाही, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले.

तसेच राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या कार्यक्रमाला जाणार की नाही? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरून, उद्धव ठाकरे हे अयोध्येला नक्की जातील, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केला आहे. तर यावरून भाजप नेते, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

राम मंदिर भूमिपूजनाचे (Ram mandir Bhoomipujan) त्यांना निमंत्रण मिळाले नाही तरी, रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवे तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येला खुशाल जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत. एवढेच नाही, तर उद्धव ठाकरे हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. हे नापासांचेच सरकार आहे, अशी टीकाही रावसाहेब दानवे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER