
पुणे :- सिम्बायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत पहिला पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात अर्ध्याहून अधिक लोकांना मराठी भाषेची समज होती. तरीही मराठी भाषेचे मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी इंग्रजीतून भाषण दिले. त्यानंतर उपस्थितांमध्ये चर्चेला सुरुवात झाली.
एकीकडे राज्यपाल आणि मुख्यमंत्री जाहीर कार्यक्रमात उपस्थितांना मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करतात, तर दुसरीकडे मराठी भाषा विभागाचे मंत्री इंग्रजीतून भाषण करतात. पहिल्यांदा देसाई यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली तर सर्वांनी त्यांना दाद दिली. नंतर त्यांनी इंग्रजीतून भाषण केल्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. मराठी भाषा विभागाचे मंत्रीच मराठीत भाष्य करत नाहीत, तर मराठी भाषेची प्रसिद्धी कशी होईल, अशी चर्चा समारंभात होत होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला