” नव्या भूमिकेसाठी खास ट्रेनिंग “

Prajakta Gaikwad.jpg

मराठी टेलिव्हिजन (Marathi television) क्षेत्रात नव्याने उदयास आलेला एक खास चेहरा म्हणजे अभिनेत्री , डान्सर प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). ” नांदा सौख्य भरे “ या मालिकेतून अभिनयात पदार्पण करून पुढे ” स्वराज्य रक्षक संभाजी “ या गाजलेल्या मालिकेत येसूबाईची भूमिका साकारणारी प्राजक्ता. प्राजक्ता लवकरच एका नवीन मालिकेतून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरचं ” आई माझी काळूबाई “ ही नवी मालिका येणार असून प्राजक्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. नव्या मालिके साठी प्राजक्ता ने खास तयारी देखील केली आहे. बघूया प्राजक्ता या नव्या मालिकेसाठी काय वेगळी तयारी केली आहे.

या मालिकेत प्राजक्ता पहिल्यांदा तिच्या वयाला साजेल अशी भूमिका करणार आहे. आगामी मालिकेत ती एका महाविद्यालयलयीन मुलींच्या रुपात आपल्याला दिसणार आहे. या नव्या मालिकेत प्राजक्ता ” आर्या ” हे पात्र साकारणार आहे. नव्या मालिकेत काम करताना तिला धम्माल येते आहे पण या मालिके साठी तिने खास मेहनत सुद्धा घेते आहे. नव्या मालिकेत काम करण्यासाठी प्राजक्ता ने चक्क वजन कमी केलंय. महाविद्यालयीन मुलींचा रोल साकारण्यासाठी फिटनेस कडे खास लक्ष दिलंय. फिटनेस सोबत प्राजक्ता च्या लुक मध्ये कमालीचा वेगळा अंदाज बघायला मिळणार आहे. नव्या भूमिकेला वाव देण्यासाठी तिने खास प्रयन्त करायला सुरुवात केली असून सध्या या मालिकेचं शूट जोरदार सुरू आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये येसूबाई साकारताना देखील तिने खास ट्रेनिंग घेतलं होतं या खास अनुभवा विषयी सांगताना प्राजक्ता सांगते ” मला जेव्हा कळालं मी ही भूमिका करतेय तेव्हा मला अमोल दादांनी पहिला प्रश्न असा केला होता की तुला घोडेस्वारी, तलवार बाजी येते का? मी तिथे नाही असं म्हणून आले होते पण त्या माझ्या नाही म्हणण्यात सुद्धा एवढी सकारात्मकता होती की पुण्यात आल्या नंतर पुढच्या आठ दिवसात मी सगळं शिकले. घोडेस्वारी, तलवारकाठी आणि हे सगळं होऊन शूटींग सुरू व्हायला १५ दिवस होते. मला एक लिस्ट दिली त्यात अनेक पुस्तकांची, कादंबऱ्याची, चरित्र कथा आहेत हे सगळं वाचून त्या भूमिकेसाठी माझा अभ्यास झाला. मग सेट वर लाठीकाठी, घोडेस्वारीचा सराव असे. हा एक प्रकारे त्या भूमिकेसाठीचा अभ्यासचं होता. अजून सुद्धा हा अभ्यास चालूच आहे आणि हे सगळं करून मी सीन करायला उभी राहते तेव्हा अमोल दादा कडून खुप शिकायला मिळतं. एक सहकलाकार म्हणून त्याला सांभाळून घेणं इथपासून ते संवाद कसे करावेत हे सगळं त्याचा कडून शिकतेय. दडपण असं नाही आलं कारण आपण जीव ओतून काम केल्यावर प्रेक्षकांकडून कमालीचा प्रतिसाद आला. त्या प्रतिसादामुळे काम करण्याची ओढ वाढते. सुरुवातीला थोडं साडी, दागिने सांभाळण्यात अडचण आली, पण नंतर हे सगळं सांभाळून घ्यायला जमत गेलं. आमची टीम एवढी मस्त आहे की कधी अडचण आलीच नाही”

प्राजक्ता साठी प्रत्येक भूमिका ही नवीन आणि तितकीच अभ्यासपूर्ण शिकवून जाणारी आहे. येसूबाई या भूमिके ने प्राजक्ता ला एक वेगळीच ओळख दिली या भूमिकेमुळे तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल देखील झाला आहे. तिच्या या खास बदला विषयी ती काहीतरी खास गोष्ट सांगतेय ” येसूबाई साकारून १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे एक वर्ष इतकं काही देऊन गेलंय. आपण काम करताना प्रेक्षकांचा कधीच हिरमोड होऊ नये हेच डोक्यात ठेवुन प्रत्येक कलाकाराने काम करायला हवं असं मला वाटतं. अनुभव खूप भन्नाट आणि मस्त असतात. फॅन फॉलोइंग सुद्धा वाढलंय आता कुठे ही गेली की लोक आधी मुजरा आणि नमस्कार करतात, पाया पडतात, कधीचं कोणी अरे तुरे करून बोलत नाही प्रत्येकांच्या बोलण्यात एक मान असतो त्यांच्यासाठी आम्ही खरेतर देव आहोत. अश्या तऱ्हेने आम्हाला सगळीकडे आदरपूर्वक वागवलं जातं” प्राजक्ताच्या नवीन मालिकेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER