एक ते चार नंबरचे चौघेही टेनिसपटू उपांत्य फेरीत

ATP finals

लंडन :- एटीपी फायनल्स टेनिस (ATP Finals Tennis) स्पर्धेत एक अनोखा विक्रम तब्बल १६ वर्षांनंतर घडलाय. ही स्पर्धा आता उपांत्य फेरीच्या टप्प्यात आहे आणि उपांत्य फेरीत पोहचलेले चारही खेळाडू जागतिक क्रमवारीत क्रमाने पहिल्या चार स्थानी आहेत. यापूर्वी २००४ मध्ये आणि त्याआधी १९९० मध्ये असे घडले होते.

आता उपांत्य फेरीत जे चार खेळाडू पोहचले आहेत त्यात नंबर वन नोव्हाक जोकोविच  (Djokovic) , नंबर दोन राफेल नदाल (Nadal) , तिसऱ्या क्रमांकावरील डॉमिनिक थिम (Thiem) व चौथ्या स्थानावरील दानिल मेद्वेदेव (Medvedev) आहेत. यापैकी एक सामना नदाल वि. मेद्वेदेव आणि दुसरा सामना थिम  वि. जोकोविच असा होणार आहे.

याच स्पर्धेत २००४ मध्ये उपांत्य फेरीत जे चार खेळाडू होते ते राॕजर फेडरर (तत्कालीन नंबर वन), अँडी राॕडीक (२), लेटन हेविट (३) आणि मरात साफिन (४) हे होते. त्यावेळी लेटन हेविटला मात देत राॕजर फेडरर अंतिम विजेता ठरला होता.

त्याआधी १९९० मध्ये क्रमवारीत स्टिफन एडबर्ग (१), बोरिस बेकर (२), इव्हान लेंडल (३) आणि आंद्रे अगासी (४).  अगासीने हे क्रमाने पहिल्या चार स्थानी होते त्यावेळी एडबर्गला हरवून विजेतेपद पटकावले होते.

आधीच्या दोन्ही वेळा क्रमाने पहिल्या खेळाडूंपैकी नंबर वनच विजेता ठरला होता. आता नोव्हाक जोकोविच नंबर वन आहे. तो विजेता ठरेल का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER