काश्मिरींसाठी विशेष प्रार्थना : आमदार वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात?

Waris P

मुंबई एकीकडे देशभरात काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर देशभरात त्याचे स्वागत करण्यात आले आहे तर काश्मिरात तणावपूर्ण शांतता आहे. मुंबईत शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी  काश्मिरी जनतेसाठी विशेष पार्थना करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचा आरोप आमदार पठाण यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : कलम ३७० वर सुनावणी पुढच्या आठवड्यात – ६ पैकी ४ याचिका…

नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रार्थनेसाठी त्यांनी परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान इतर काही लोकांना ताब्यात घेतले असून वारिस पठाण यांना ताब्यात घेतले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आमदार पठाण यांना त्या जागेवरून दूर होण्यास सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करत असताना काश्मिरातील जनतेला मात्र प्राण्यांसारखे पिंजऱ्यात बंद करण्यात आले आहे, असा आरोप इल्तिजा मुफ्ती यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील निर्बंधांवरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘हम दो, हमारे पच्चीस’च्या मानसिकतेतून धर्मांध मुस्लिम बाहेर पडणार?-उद्धव ठाकरे