१९६५, १९७१च्या युद्धातील सैनिकांसाठी विशेष पेंशन योजना विचाराधीन

manoj mukund naravane

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या युद्धात लढलेल्या सैनिकांसाठी खास पेंशन देण्याची योजना आखली जात आहे.

मंगळवारी सशस्त्र सेना दिवस निमित्त कार्यक्रमात लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की याबाबत संरक्षण मंत्रालयाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ‘सेना मुख्यालयाने अनेक प्रस्ताव पाठवले आहेत. एका प्रस्तावात नमूद केल्यानुसार १९६५ आणि १९७१ या वर्षांत पाकिस्तानविरोधात लढल्या गेलेल्या युद्धातील इमर्जेन्सी कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन या हुद्द्यावर असणाऱ्या सैनिकांना स्वतंत्रता सेनानी पेंशन योजनेप्रमाणेच खास योजनेअंतर्गत पेंशन देण्याच येण्याचा विषय मांडला आहे.

१९६५ आणि १९७१च्या युद्धाच्या वेळी अधिकाऱ्यांची कमतरता भासल्यामुळे मोठ्या संख्येने इमर्जेन्सी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैनिकांची भरती करण्यात आली होती. सेवा पूर्ण करत लगेचच सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यामुळे इमर्जेन्सी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन या हुद्द्यांवर असणाऱ्या सैनिकांना पेंशनची सुविधा मिळत नाही.