कोरोनामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहीती

Varsha Gaikwad - Exams - Maharashtra Today

मुंबई : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे (Corona) दहावी-बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे. आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही, तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या सूचना

1. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार

२. विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.

३. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

४. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER