मनसेची मागणी, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था करा

Maharashtra Today

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या(Corona) दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेने संकटकाळातही २४ तास सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे विभागाला पत्र पाठवून काही मागण्या केल्या आहेत. यात विशेष म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबवण्यात (vaccination for the families of railway employees) यावी, अशी मागणी केली गेली आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना ५० टक्के(50 %) क्षमतेने कामावर बोलवण्यात यावे, अशी मागणीही केली गेली आहे.

मनसेने (MNS) दिलेल्या पत्रात म्हटल्या गेले आहे की, मागील काही महिन्यात रुग्णांच्या आकडेवारीत विक्रमी वाढ झाली आहे. रेल्वे कर्मचारीही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झाले असून, अनेक कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ विषाणूशी लढा देताना आपले प्राण गमावले आहेत. परिस्थितीतही रेल्वे कामगार आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. दिवसेंदिवस कोरोना (कोविड-१९) विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता रेल्वे कामगारांच्या आरोग्याला धोका असून बऱ्याच डेपो/स्थानक येथे कामगारांना कोरोना (कोविड-१९) विषाणूची बाधा झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. कामगार व त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याच्या घटना घडत आहेत.

अशा परिस्थितीत तातडीने कारवाई करण्याची गरज असून संदर्भ १ व २ नुसार केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने केलेल्या सूचनांप्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात यावी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना ५० टक्के क्षमतेने बोलविण्यात यावे. तसेच सर्व रेल्वे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व रेल्वे हॉस्पिटल तसेच दवाखान्यांमध्ये लसीकरणाची सोय तातडीने उपलब्ध करण्यात यावी.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button