
कसोटी क्रिकेटसाठी (Test Cricket) आजचा दिवस (26 डिसेंबर 2020) खास आहे कारण एकतर आज एकाच दिवशी तीन कसोटी सामन्यांना सुरुवात झाली. मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुध्द भारत (India vs Australia), माउंट मोंगानुई येथे न्यूझीलंड वि. पाकिस्तान (New zealand vs Pakistan) आणि सेंच्युरीयन येथे दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका (South Africa Vs Sri Lanka) .
या तिन्ही सामन्यांच्या निमित्ताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली जी यापूर्वी कधीच घडली नव्हती. पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन यष्टीरक्षक कर्णधार (Wicket keeper Captains) नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक हे तिघेही यष्टीरक्षक आहेत.
यापैकी टीम पेनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण ऑस्ट्रेलियन संघ 195 धावात बाद झाला. मोहम्मद रिझवानने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला पण न्यूझीलंडने 3 बाद 222 धावा केल्या आहेत तर क्विंटन डी कॉकने नाणेफेक गमावली आहे. याप्रकारे कसोटी सामन्यांमध्ये पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन यष्टीरक्षक कर्णधार नेतृत्व करताना दिसत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला