तिने सुवर्णपदक जिंकलेच होते पण….

Maria Vicente Spanish athlete denied gold medal in long jump

तिने उडी घेतली…लांबच लांब! सर्वांना वाटले आता सुवर्णपदक हिचेच..पण बहुतेक नशिबाला आणि पंचांना ते मान्य नव्हते. तिने घेतलेल्या लांबलचक उडीची नोंद देणारी निशाणीच/ ठसा पंचांनी चुकून पुसून टाकला आणि सुवर्णपदकाच्या आनंदाऐवजी तिच्या चेहऱ्यावर अश्रू दिसले. क्रीडा जगतात अभावानेच घडणारी आणि कोणत्याही खेळाडूच्या उत्साहावर पाणी फेरणारी ही घटना रविवारी स्पॅनिश अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये (Spanish Athletics championship) घडली आणि त्याचा फटका मारिया व्हिसेंटे (Maria Vincente) या यशस्वी खेळाडूला बसला.

तिने लांब उडीच्या (Long Jump) पहिल्याच प्रयत्नात 6.50 मीटरचे अंतर पार केले होते पण, पीट ठिकाणी नेमलेल्या दोन निरिक्षकांना वाटले की तिने ‘फाउल’ केला म्हणून त्यांनी तिच्या उडीची निशाणी पुसुन टाकली पण रिप्लेंमध्ये स्पष्ट दिसले की तिने घेतलेली उडी योग्यच होती. तिने रेषेच्या पुढे पाउल टाकून उडी घेतलेली नव्हती. हे स्पष्ट झाल्यावर अधिकाऱ्यांनीसुध्दा चूक मान्य केली आणि तिला आणखी एक संधी देण्यात आली पण आधीच्या या गोंधळाने मारियाचे लक्ष विचलीत झाले होते त्यामुळे पुढच्या उडीला तिचा ‘फाउल’ झाला, नंतर तिने 6.24 मीटर व 4.83 मीटरची उडी नोंदवली पण शेवटी तिला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. फातीमा दियाम हिने 6.51 मीटरच्या उडीसह सुवर्णपदक जिंकले तर टेस्सी एबोसेले हिने 6.31 मीटरसह रौप्यपदक प्राप्त केले.

या स्पर्धेनंतर रडवेली झालेली मारिया म्हणाली की, जे काही घडले त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पंचांनी पाहिले की ती वैध उडी होती पण पीटजवळच्या अधिकाऱ्यांना ती वैध नाही असे का वाटले कुणास ठाऊक? मी माझे सर्वोत्तम देण्यासाठी बाजी लावली होती पण या गोंधळाने माझा विजय हिरावला.

या प्रकारानंतर स्पॅनिश अ‌ॅथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी तिची आणि तिच्या प्रशिक्षकांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की स्पर्धांचे उत्तम आयोजन करणे ही आमची जबाबदारी आहे पण शेवटी माणसं आहेत, चुका होतातच. असे पुन्हा होणार नाही याची मात्र आम्हाला काळजी घ्यावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER