वजन कमी न केल्याने आमिरसह ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये काम करू शकला नाही हा साऊथचा सुपरस्टार

Southern superstar could not work with Aamir in 'Lal Singh Chadha' due to weight loss

आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. यशराजच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या सुपरफ्लॉप सिनेमानंतर आमिर कान त्याचा नवा सिनेमा घेऊन येत असल्याने त्याच्या या सिनेमाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. हॉलिवूडच्या सुपरहिट ‘फॉरेस्ट गम्प’ सिनेमाची हिंदी रिमेक असलेला हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांना आपला वाटावा यापद्धतीने सिनेमात बदल करण्यात आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आपला वाटावा आणि बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींच्या उड्या घ्यावा यासाठी आमिरने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र या सिनेमात साऊथचा एक सुपरस्टार काम करणार होता. स्वतः आमिरने त्याला कथा ऐकवली होती पण या सुपरस्टारने वजन कमी न केल्याने तो सिनेमा करू शकला नसल्याची माहिती आता समोर आली आहे.

विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हा तामिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे. त्याचा नुकताच रिलीज झालेला ‘मास्टर’ (Master) सिनेमा ज्यात त्याने थलपती विजय (Thalapathy Vijay) सोबत काम केले आहे, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. या सिनेमातील त्याचा व्हिलन प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. विजय सेतुपती बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ मध्येही दिसणार होता. तो आमिर खान सोबत दिसणार म्हटल्याने त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंदही झाला होता. पण आमिर आणि सेतुपती विजय काही एकत्र येऊ शकले नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खानने लाल सिंह चड्ढासाठी विजय सेतुपतीला विचारले होते. याबाबत बोलताना विजयने सांगितले, आमिर सर स्वतः मला या सिनेमासाठी साईन करण्यासाठी तामिळनाडूमध्ये जेथे मी शूटिंग करीत होतो तेथे आले होते. सिनेमाचा दिग्दर्शक अव्दैत चंदन काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. तेव्हा आमिर सरांनी स्वतः मला सिनेमाची कथा ऐकवली. ते बॉलीवूडचे इतके मोठे सुपरस्टार आहेत याचा त्यांना कसलाही गर्व नव्हता. आमिर सर एक खूपच चांगले स्टोरीटेलर आहेत. त्यांनी कथा ऐकवल्यानंतर मी लगेचच त्यांना होकार दिला. त्या रात्री ते तामिळनाडूत थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला परत गेले होते. त्यांनी मला या भूमिकेसाठी वजन कमी करण्यास सांगितले होते असेही विजयने सांगितले.

मात्र विजयने वजन कमी न केल्याने आमिरने सिनेमातून विजयचा पत्ता कट केला आणि दुसऱ्या कलाकाराला घेऊन शूटिंग पूर्ण केले. मात्र हा सिनेमा करू न शकल्याचा खेद विजय सेतुपतीला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER